तुम्हालाही व्यवसाय करायचा आहे का? पण कल्पना सुचत नाहीत, तर हे वाचा, new business idea

new business idea: कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत आणि अनेक लोकांना व्यवसाय सुरु करण्याची गरज आहे. अनेक whatsappद्वारे मला प्रश्न आले आहेत की, “सर, आम्हाला व्यवसाय करायचा आहे, पण कोणता करावा हे सुचत नाही.” आजच्या blog मध्ये, मी तुम्हाला व्यवसाय सुरु करण्याच्या कल्पना शोधण्याच्या तीन प्रभावी पद्धती सांगणार आहे. ह्या पद्धती वापरून तुम्हाला नफा देणारा व्यवसाय निवडण्यास मदत होईल. प्रत्येक पद्धतीसाठी मी काही उदाहरणे देखील देईन.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

1. समस्या सोडवणे

पहिली पद्धत म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या समस्यांचा अभ्यास करणे आणि त्यावर उपाय शोधणे. उदाहरणार्थ, मुंबईत ट्राफिकची समस्या सर्वश्रुत आहे. मुंबईतील एका युवकाला या ट्राफिकमध्ये अडकलेल्या लोकांना भूक लागण्याची शक्यता सुचली. त्याने मुंबईतील ट्राफिक जास्त असलेल्या ठिकाणी वडापाव आणि पाण्याच्या वाटल्या विकायला सुरुवात केली. या व्यवसायामुळे त्याने लाखोंची कमाई केली.

दुसरे उदाहरण म्हणजे, माझ्या सोसायटीतील 600 पेक्षा जास्त फ्लॅट्स आहेत. कोरोना वाढल्यामुळे अनेक रुग्णांमध्ये घराबाहेर जाण्याची स्थिती होती. यावेळी एका व्यक्तीने टिफिन सेवा सुरु केली, ज्याामुळे त्याचा व्यवसाय जोरात चालू लागला.

Investment In Real Estate:रिअल इस्टेटमधील गुंतवणूक तुमची स्वप्न पूर्ण करेल | फक्त ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

2. चालू व्यवसायांचा अभ्यास

दुसरी पद्धत म्हणजे चालू असलेल्या व्यवसायांचा अभ्यास करणे आणि त्यात सुधारणा कशी करता येईल हे पाहणे. उदाहरणार्थ, चहा विकणाऱ्या टपर्‍या पिढ्यांपासून चालत आल्या आहेत. पण पुण्यात दोन युवकांनी “तंदूर चहा” नावाची नवीन संकल्पना आणली आणि त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळाला.

याच प्रकारे, व्हाट्सअपच्या बाजारात असताना, त्याच्या त्रुटींचा अभ्यास करून “टेलिग्राम” हे नवीन कम्युनिकेशन अ‍ॅप आले, ज्यामुळे व्हाट्सअपच्या वापरकर्त्यांनी टेलिग्रामचा वापर करायला सुरुवात केली.

आता प्रत्येक गरीबाच्या घरात इलेक्ट्रिक स्कूटर असेल! Hero देशातील सर्वात स्वस्त स्कूटर Hero Electric AE-8 E-Scooter लाँच करणार आहे.

3. नवीन व्यवसायांचा शोध

तिसरी पद्धत म्हणजे पूर्णपणे नवीन व्यवसायाचा शोध घेणे जो त्या वेळेला कोणीही सुरू केलेला नसेल, पण ज्याची मोठी गरज असेल. बल्ब, विमान, ट्रेन, आणि मोबाईल यांसारख्या अनेक मोठ्या शोधांनी हे सिद्ध केले आहे की नवीन विचारांनी मोठे बदल घडवता येतात.

या पद्धतीने तुम्ही यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत आणि बुद्धी लागेल. कदाचित, उद्या तुमच्यातून एखादा बिल गेट्स किंवा मुकेश अंबानी उभा होईल.

दररोज ₹1000 ते ₹1500 कमवा! कोणत्याही गुंतवणुकीशिवाय घरबसल्या पार्टटाइम जॉब करा,Online Part Time Jobs

निष्कर्ष

आशा आहे की, या तीन पद्धती तुम्हाला योग्य व्यवसाय निवडण्यास मदत करतील. तुमच्याकडे व्यवसाय संदर्भात अजून कोणतेही प्रश्न असतील तर message करून सांगा. आमच्या whatsapp आणि telegram group ला जॉईन करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा.

धन्यवाद! पुन्हा भेटूया नवीन माहितीसह.

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

2 thoughts on “तुम्हालाही व्यवसाय करायचा आहे का? पण कल्पना सुचत नाहीत, तर हे वाचा, new business idea”

Leave a Comment

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.
join WhatsApp Group