MJPJAY GR : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना नवीन निधी मंजूरी

MJPJAY GR – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवा शासन निर्णय घेऊन या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, प्रत्येक लाभार्थ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत घेण्यात आलेला आहे, जो तीन जून 2024 रोजी प्रकाशित झाला आहे.

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे सलगणीकरण करून दोन्ही योजना राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयामध्ये घेण्यात आलेला आहे. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी सन 2024-2025 या वित्तीय वर्षासाठी एकूण 650 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पीय करण्यात आला आहे.

निधी मंजूरी आणि वितरण | MJPJAY GR

माहे एप्रिल 2024 ते जून 2024 या कालावधीसाठी अदा करण्यात आलेल्या विमा हप्त्यासाठी फरकाची रक्कम 49 कोटी 67 लाख 58 हजार रुपये इतका निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीस वितरित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे.

विमा हप्ता आणि आर्थिक वर्ष | MJPJAY GR

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत काम केले जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांसाठी दिनांक 1 एप्रिल 2024 ते 30 जून 2024 या मासिक कालावधीतील विमा हप्ता 2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीतून खालील लेखा शीर्षकांतर्गत विमा हप्ता फरकाची रक्कम 49 कोटी 67 लाख 58 हजार रुपये सशस्त्र निधी राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या खात्यावर तात्काळ वर्ग करण्यासाठी नियंत्रक अधिकाऱ्याकडे सपूध करण्यात येत आहे.

धनादेश आणि वितरण प्रक्रिया | MJPJAY GR

सदर रकमेचा धनादेश राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या नावे काढण्यात यावा असा स्पष्टपणे या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे.

शासन निर्णयाची उपलब्धता | MJPJAY GR

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या दवाखान्याचा खर्चासाठी जर पैसे लागत असतील तर प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत ही माहिती जाणे गरजेचे आहे. मित्रांनो, हा शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असल्यास, तो www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा उपलब्ध आहे.

समधित योजना

प्रधानमंत्री जननी सुरक्षा योजनाCLICK HERE
आयुष्मान भारत योजनाCLICK HERE
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड OnlineCLICK HERE
शेतकरी सरकारी योजना महाराष्ट्रCLICK HERE

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

join WhatsApp Group