mansun updates: महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती

mansun updates – आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सात जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे. जोरदार वादळी पावसाची शक्यता असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

चक्राकार स्थिती आणि कमी दाबाचा पट्टा

बंगालच्या उपसागरामध्ये एक हवेची चक्राकार स्थिती निर्माण होत आहे आणि तिची तीव्रता वाढताना दिसत आहे. त्यामुळे लवकरच ती चक्राकार स्थिती तीव्र कमी दाब आणि नंतर चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे वादळ महाराष्ट्राच्या दिशेने येताना दिसत आहे.

दक्षिण भारतातील स्थिती | mansun updates

दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या प्रदेशांमध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. भारताच्या दक्षिण टोकापासून उत्तर प्रदेशपर्यंत विदर्भाच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोकणातील पावसाची शक्यता

दक्षिण कोकणात, सावंतवाडी, गारगोटी, राजापूर, कोल्हापूर, सांगलीच्या पश्चिम परिसरात मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गोवा आणि त्याच्या परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना दिसत आहे.

मुंबई, नाशिक आणि पुण्यातील हवामान

मुंबई, पालघर, ठाणे येथे ढगाळ वातावरण राहील. दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक आणि आसपासच्या परिसरात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील स्थिती | mansun updates

उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे, जळगाव येथे दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव येथे पावसाचा जोर कमी राहील.

विधर्भातील स्थिती | mansun updates

वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे पावसाची शक्यता नाही. अमरावती विभागात अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ येथेही पावसाची शक्यता कमी आहे.

दक्षिण कोकणातील पावसाचा जोर

दक्षिण कोकणात, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर येथे दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, आज महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती आपल्याला समजली. राज्यातील विविध भागांमध्ये हवामानात बदल होणार आहेत. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या website ला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या updates तुमच्या पर्यंत पोवचतील.

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.
join WhatsApp Group