कापूस-सोयाबीन अनुदान: शेतकरी मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कापूस अनुदानाच्या वाटपाची तारीख अखेर ठरली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून हेक्टरी 5000 रुपये देण्यात येणार आहेत, आणि ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
कृषी विभागाच्या बैठकीत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
राज्याच्या कृषी विभागाची एक महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सन 2023 च्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या हेक्टरी 5000 रुपये मदतीच्या वितरणाच्या तांत्रिक अडचणींवर चर्चा करण्यात आली.
महाआयटी आणि महसूल विभागाच्या सहाय्याने तांत्रिक अडचणी सोडवण्यात आल्या, आणि अखेर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला की येत्या 10 सप्टेंबरपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस अनुदानाची रक्कम थेट वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजनेसाठी फक्त हेच शेतकरी पात्र आहेत, ladka shetkari yojana
कापूस अनुदानासाठी ठरलेले बजेट
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1548.34 कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे ठरवण्यात आले आहे. तर सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांसाठी 2646.34 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
10 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावे की 10 सप्टेंबरपासून कापूस अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती तपासून घ्यावी. यासाठी कृषी विभागाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
अनुदानाचा लाभ घ्या आणि व्यवसायात सुधारणा करा
कापूस अनुदानामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करणार असून, त्यांच्या शेती व्यवसायाला एक नवी दिशा देईल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा आणि आपला व्यवसाय अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न करावा.
अशाच नवीन नवीन अपडेट साठी आमच्या whatsapp आणि telegram group ला जॉईन करा, दोन्ही लिंक वर दिल्या आहेत.
जय जवान, जय किसान!
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more