farmer subsidy: सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अनुदान मिळणारे, पण आता एक चर्चा अशी आहे की सरकार या अनुदानाचा वाटप नेमकं कधी करणार आहे म्हणजे कोणत्या तारखेपासून अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होणार आहेत.
अनुदान विलंबाचे कारण
दुसरीकडे असेही बोलले जाते की अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन कारणे दिली जातात:
- 2023 च्या खरीप हंगामातील इपिक पाहणीच्या नोंदणीवरून शेतकऱ्यांमध्ये उडालेला गोंधळ
- कृषी आणि महसूल विभागाचा कारभार
अनुदान वाटपाची तारीख
एक अशी चर्चा आहे की 21 ऑगस्ट पासून म्हणजेच बुधवारपासून सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणारे. पण यातलं खरं काय आणि खोटं काय, नेमकी वस्तूस्थिती काय, याचीच माहिती आम्ही राज्य कृषी विभागाकडून घेतली आहे.
पात्र शेतकरी आणि अनुदानाची रक्कम
राज्य सरकारने 2023 च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये किमान दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे. एका शेतकऱ्याला दोन हेक्टरसाठी जास्तीत जास्त दहा हजार रुपये, तर वीस गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसकट एक हजार रुपये मिळणार आहेत.
पात्र शेतकरी कोण?
या योजनेसाठी पात्र शेतकरी कोण असणार तर ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी किंवा पोर्टलवर नोंदणी केली आहे असे शेतकरी पात्र ठरणार आहेत. पात्र शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारने आधारच्या माहितीचा वापर करण्यासाठी संमती पत्र शेतकऱ्यांकडून भरून घ्यायचं ठरवलेलं आहे.
सामायिक खातेदारांची प्रक्रिया
सामायिक खातेदारांना एक ना हरकत प्रमाणपत्र भरून द्यावा लागणार आहे जेणेकरून सामायिक खातेदारांच्या नावावरील अनुदान रक्कम एका खातेदाराच्या नावावर जमा करण्यात येईल.
अनुदानाच्या पात्रतेसाठी राज्यातील शेतकरी
कृषी विभागांना दिलेल्या माहितीनुसार, 2023 च्या खरीप हंगामात ईपीक पाहणी केलेली राज्यातील 90 लाख सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी या योजनेला पात्र ठरले. यात 58 लाख सोयाबीन उत्पादक आणि 32 लाख कापूस उत्पादक शेतकरी आहेत.
सामायिक खातेदारांकडून प्रक्रिया सुरू
75 लाख खातेदार आहेत, तर १५ लाख सामायिक खातेदारांचा समावेश आहे. या खातेदारांकडून आधार संमती पत्र आणि सामायिक खातेदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुधवार म्हणजेच 21 ऑगस्ट पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असेही कृषी विभागाने सांगितले.
अनुदान हस्तांतरणाची प्रक्रिया
राज्य सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कृषी आयुक्तांच्या नावाने खाते उघडण्यासाठी शासन मान्यता दिली आहे. या योजनेसाठी 4194 कोटी रुपयांचा निधी या खात्यावर जमा करण्यात येणार आहे, आणि त्यानंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल.
अनुदानाची कार्यवाही कधी सुरू होईल?
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी कृषी विभाग काम करतोय. परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल. सोयाबीन आणि कापूस अनुदान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात होईल, असं कृषी विभागाने स्पष्ट केलंय.
राशन कार्ड धारकांना राशन सोबत मिळणार या 7 महत्वाच्या वस्तू मोफत, Ration card holders
शेतकऱ्यांचे रोष
अनेक शेतकऱ्यांनी पेऱ्यात सातबारावर सोयाबीन कापूस तोडणी केलेली आहे, पण यादीत मात्र नाव नाही आहे, त्यामुळे शेतकरी कृषी विभागावर रोष व्यक्त करत आहेत. कृषी विभाग म्हणतोय, महसूल विभागांना दिलेल्या डाटा नुसार यादी जाहीर करण्यात आली आहे.
अनुदान यादी आणि शेतकऱ्यांची अपेक्षा
सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पण या सगळ्यात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मात्र हैराण झाले आहेत.
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more