माझी लाडकी बहिन योजनेचा फॉर्म पेंडीग दिसतोय | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना महाराष्ट्र प्रश्न आणि उत्तरे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आपण काही महत्त्वपूर्ण तुमच्या मनातील प्रश्न आहेत त्याची उत्तरे देण्याचा या blog मध्ये प्रयत्न करणार आहे. आता काय काय प्रश्न आहेत ते मी थोडे काढलेले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

Table of Contents

फॉर्म भरून सबमिट केल्यानंतरही फॉर्म पेंडिंग का दाखवतो?

आता मित्रांनो फॉर्म पेंडिंग का दाखवतो? कारण तुमचा फॉर्म पूर्णपणे भरलेला आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला काही करायचं नाही, आता ते सरकारचं काम आहे. फॉर्म पेंडिंग का दाखवतो? तर सरकारी अधिकारी तो जो फॉर्म तुम्ही भरलेला आहे, तो फॉर्म चेक करतील. त्यामध्ये कागदपत्र तुमची माहिती हा फॉर्म संपूर्ण चेक झाल्यानंतर तो फॉर्म जो आहे, तो मंजूर केला जाईल आणि त्यानंतर तुमचा स्टेटस आहे ते चेंज होईल.

यामध्ये तुम्हाला काय घाबरायची गरज नाही. तुम्ही तुमचं काम केलेलं आहे. आता फॉर्म पेंडिंग आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो तो सरकारकडे पेंडिंग आहे. सरकारी अधिकारी तो फॉर्म चेक करतील, त्यामध्ये काही तोटे असतील तर तुम्हाला सांगतील, ते दुरुस्तीसाठी सुद्धा पाठवू शकतात. आणि जर त्यामध्ये काही चुका नसतील तर तुमचा फॉर्म केला जाईल, त्यानंतर तिथून पुढे तुमचे जे काही पैसे आहेत, ते पैसे तुम्हाला मिळतील. तर काही प्रॉब्लेम नाही, फॉर्म पेंडिंग मध्ये आहे तर लाखो फॉर्म पेंडिंग मध्ये आहेत. तर काही चिंता करायची गरज नाही. पुढचे काही प्रश्न आहेत ते आपण घेऊयात.

कधी होणार तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर,अर्ज प्रक्रिया आणि महत्वाची माहिती

इमेज नॉट सपोर्ट प्रॉब्लेम?

आता भरपूर जणांना एक प्रॉब्लेम होते, तो म्हणजे इमेज नॉट सपोर्ट. तुम्ही स्क्रीन वरती दाखवतो अशा पद्धतीने प्रॉब्लेम येतो आणि कोणतेही डॉक्युमेंट दिसत नाहीत. पासपोर्ट साईज फोटो काढला असेल किंवा लाईव्ह फोटो काढला असेल, तर तो तुम्हाला तिथे दाखवला जात नाही. तर हा प्रॉब्लेम काय आहे? हा प्रॉब्लेम तुमचा नाही, हा प्रॉब्लेम ॲपचा आहे. त्यामुळे तुम्हाला काही घाबरायची गरज नाही. तुम्हाला अशा पद्धतीने जर दाखवत असेल हा स्क्रीन वरती फोटो अशा पद्धतीने दाखवत असेल, तर तुम्ही बिनधास्त फॉर्म तुम्ही सबमिट करा आणि ओटीपी टाकून तो फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता, काही तुम्हाला अडचण येणार नाही. हाय याचा प्रॉब्लेम आहे.

पासपोर्ट साईज फोटो अपलोड करू शकतो का?

पुढचा प्रश्न आहे पासपोर्ट साईज फोटो तो आम्ही अपलोड करू शकतो का असे भरपूर जण विचारतात. तर जो काही नवीन जीआर काल आलेला आहे त्यानुसार तुम्ही आता जो काही पासपोर्ट साईज फोटो आहे तो तुम्ही अपलोड करू शकता. लाईव्ह सुद्धा अपलोड करू शकतो, आणि पासवर्ड पासपोर्ट साईटचा फोटो सुद्धा तुम्ही आता अपलोड करू शकणार आहात.

मोफत टॅबलेट योजना: महाराष्ट्र सरकार आणि महाज्योती यांच्या तर्फे मोफत tablet मिळणार विद्यार्थ्यांना, येथून अर्ज करा

अधिवास प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड अपलोड करू शकतो का?

जे काही उत्पन्न दाखला ज्यांच्याकडे नाहीये, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीये, त्यांनी स्वघोषणापत्र अपलोड करू शकतो का असे विचारतात. तर याचा उल्लेख कोणत्याही जीआर मध्ये अजून करण्यात आला नाहीये. भरपूर घोषणा वगैरे झाल्या असतील, तर जीआर मध्ये याचा उल्लेख नाहीये. त्यामुळे स्वघोषणापत्र तुम्ही अपलोड करू नका. तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतो. तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, तर उत्पन्नाचा दाखला अपलोड करा. उत्पन्नाचा दाखला नसेल, तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकता.

वेबसाईट पोर्टल कधी येणार?

तर वेबसाईट पोर्टल सुद्धा येणार आहेत. एका आठवड्याच्या आत मध्येच वेबसाईटचे असेल पोर्टल असेल ते येईल. तर ज्यांना असतील माही सेवा केंद्र चालक असतील, तर त्यांना यावरती सुविधा मिळणार आहे. त्यांचं लॉगिन करून आणि त्यांना कमिशन सुद्धा 50 रुपये देण्यात येणार आहेत.

ॲप मधून कितीही फॉर्म भरू शकतो का?

मधून तुम्ही कितीही आणि कोणीही कोणताही व्यक्ती कितीही फॉर्म भरू शकतो. तसं बनवलं आहे. तुम्ही घरबसल्या फॉर्म भरा, तुम्ही कोणाचेही फॉर्म भरा. अॅप असं बनवलं आहे की त्यामध्ये कोणालाही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. घरबसल्या कोणीही कितीही कोणाचेही फॉर्म भरू शकता. तर हा प्रश्न तुमचा क्लिअर झाला असेल.

New Women Scheme in Maharashtra : महिलांसाठी अजून नवीन दोन योजना आजपासून सुरू झाल्या, पहा पूर्ण माहिती

जन्मतारीख, नाव, जिल्हा चुकला असल्यास?

आधार कार्ड अपडेट करूनच फॉर्म भरा.

अधिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला या दोन्ही ठिकाणी आम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकतो का?

तर मित्रांनो लक्षात ठेवा, अधिवास प्रमाणपत्र जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पंधरा वर्षांपूर्वीच रेशन कार्ड जर असेल, तर तुम्ही अपलोड करू शकता. जर 15 वर्षांपूर्वीच जर ते रेशन कार्ड नसेल, तर तुम्ही त्या दोन नंबरच्या ऑप्शन मध्ये म्हणजे अधिवास प्रमाणपत्र मध्ये तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकत नाही. हा पण क्लिअर झाला. मग रेशन कार्ड तुम्ही कुठे अपलोड करू शकता? तर कोणतेही रेशन कार्ड तुम्ही म्हणजे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुम्ही उत्पन्नाचा जो दाखला आहे, तिथे तुम्ही अपलोड करू शकता. तिथे तुम्हाला अट नाहीये पंधरा वर्षाची. तुमचं नवीन रेशन कार्ड असू द्या किंवा जुने रेशन तुम्ही त्या ठिकाणी म्हणजेच उत्पन्नाच्या दाखल्याच्या ठिकाणी तुम्ही तुमचं पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड अपलोड करू शकता. हा पॉईंट क्लिअर झाला.

जॉईन खातं चालेल का?

तर जॉईन खातं चालणार नाही. जॉईन खात्यामध्ये कसं असतं, कधी जॉईन खातं मुलीचं असतं, कधी मुलाचं जॉईन खातं असतं किंवा पतीचं जॉईंट असतं, तर अशा ठिकाणी वडिलांचं जॉईंट असतं. अशा ठिकाणी काय होतं, जे काही पैसे आहेत ते तुम्हाला बरोबर येणार नाहीत. कारण आधार कार्ड ने पैसे येणार आहेत. काही ठिकाणी आधार लिंक वडिलांचं असतं किंवा आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे जॉईन खातं अपलोड करू नका. सिंगल जे काही अकाउंट आहे ते तुम्ही नवीन काढू शकता आणि ते खातं महिलांनी अपलोड करणे गरजेचे आहे.

पीएम किसान योजनेच्या महिला लाभार्थ्यांना फायदा मिळेल का?

तर जो काही नवीन जीआर काल आलेला आहे. जे ज्या महिला पीएम किसान योजनेचा लाभ घेतात, ज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळतो, त्या सुद्धा आता या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात. परंतु तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायची गरज नाही. पीएम किसान योजनेत जनता पैसे येतात ज्या महिलांना त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायची गरज नाही. कारण तुमचा जो डाटा आहे, तोच संपूर्ण डाटा सरकारकडे अगोदर आहे. तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही. फक्त तुम्हाला जो ऑफलाइन फॉर्म आहे, त्या फॉर्मची प्रिंट काढायची. त्यावरती तुमची माहिती सर्व माहिती आणि तो फॉर्म तुम्हाला कुठे द्यायचे? अंगणवाडी सेवेकडे जमा करायचा आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायची गरज नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोबाईलवरून अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात, कुठेच जायची गरज नाही, नारीशक्ती app

संजय गांधी निराधार योजना/श्रावण बाळ योजना अंतर्गत लाभ मिळतो का?

असं नाही मित्रांनो, तुम्हाला पंधराशे रुपये जे आहेत ते मिळतात. ज्यांना पंधराशे किंवा पंधराशे पेक्षा जास्त रुपये मिळत असतील, तर तुम्ही या लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरू शकत नाही. भरपूर जण हा प्रश्न विचारत होते, तर तुम्ही पात्र नाही.

नवविवाहित महिलांचे रेशन कार्ड नसल्यास?

त्यांचे रेशन कार्ड वरती नाव नाही. टू ट्वेंटी नवीन अशा महिला आहेत, त्यांचे रेशन कार्ड वरती नाव नाही. तर त्या लाभ घेऊ शकतात का? तर अशी कुठलीच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. रेशन कार्ड वरती नाव पाहिजे, कारण लक्षात ठेवा, तुम्हाला पाचशे रुपये दिले जाणार आहेत. त्यासाठी तुमच्या संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आधार लिंक असलेलेच बँक खाते जोडू शकतो. फक्त आधार लिंक असलेलं बँक खाते अपलोड करू शकता. अद्यापही आधार लिंक केले नसेल, तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. हे लक्षात ठेवा. म्हणजे हे सगळं आहे.

आता काही महत्वाच्या गोष्टी होत्या, या महत्वाच्या गोष्टी मी सांगून टाकतो. आत्ता जी माहिती मी दिली आहे ही माहिती खूपच महत्वपूर्ण आहे. तुम्हाला चुकूनसुद्धा कोणी दुसरी माहिती दिली असेल, तर ती लक्षात घेऊ नका. कारण सरकारच्या जीआर ने याचा कुठलाही उल्लेख करण्यात आलेला नाही. मग अजून काही माहिती असतील, तर या तुम्ही विचारू शकता. हे सगळं माहिती आमच्या टीम ने काढलेली आहेत.

ती माहिती ही तुम्हाला देत आहोत. अजून काही नवीन माहिती असेल, तर आम्ही अपडेट करू शकतो. तर मित्रांनो याचा जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुम्हाला माहीत आहे किती वाईट स्थिती आहे. लोक फॉर्म भरत आहेत आणि एक दिवसाला 50 ते 60 हजार फॉर्म भरले जात आहेत. तुम्हाला माहीत असेल किती महिलांना फॉर्म भरायचे आहेत. त्यामुळे एक फॉर्म ही महत्वाचा आहे, आणि तो फॉर्म रिजेक्ट होऊ नये म्हणून या माहितीचा फायदा तुम्ही घेऊ शकता. पुढची माहिती काही दिवसांनी अजून मिळेल. तोवर धन्यवाद.

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.
join WhatsApp Group