महिला व मुलींसाठी विविध योजना – नमस्कार मित्रांनो, सद्या महाराष्ट्र सरकार ने महिलांसाठी खूप साऱ्या योजना राबवल्या आहेत. ह्या सर्व योजनांविषयी माहिती असते फार गरजेच आहे. तुम्ही ह्या योजनांचा उपयोग घेतला पाहिजे हा आमचा सर्वात मोठा प्रयत्न आहे. ह्या योजनांचा उद्धेश म्हणजे महिलांना सक्षम बनवणे आहे. तर ह्या योजनेत कसा लाभ भेटणार आहे आणि किती लाभ भेटणार आहे. खाली मी सर्व माहिती दिली आहे , हा blog पूर्ण वाचा जेणेकरून तुमच्या नाज्र्तून कोणती योजना हुकली नाही पाहिजे.
महिला व मुलींसाठी विविध योजना राबवल्या आहेत?
नोंदणीकृत विवाह योजना
नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना अनुदान दिले जाते. पूर्वी हे अनुदान दहा हजार रुपये होते, जे आता 25 हजार रुपये करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
पर्यावरण सहाय्यभूत ठरेल अशी ही योजना आहे. प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येतील. 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनामध्ये अजून एक वेळेस सुधारणा, आताची मोठी बातमी
स्वरोजगार निर्मिती आणि पिंक रिक्षा योजना
महिलांसाठी स्वरोजगार निर्मिती आणि सुरक्षित प्रवासासाठी पिंक रिक्षा योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 17 शहरात 10000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसाह्य करण्यात येईल. या योजनेसाठी 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
या योजनेचा उद्देश महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन आहे. वय 21 ते सात वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये प्रदान करण्यात येईल. या योजनेसाठी दरवर्षी 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल.
स्तन गर्भाशय मुखाचा कर्करोग तपासणी
राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी 78 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येईल.
अष्टशूत्री महिला धोरण
महिला व मुलींना सामाजिक, प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रात समान हक्क व दर्जा प्राप्त होण्यासाठी पोषण आहार, स्वास्थ्य, शिक्षण, उद्योजकता आणि कौशल्य विकासासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील.
लेक लाडकी योजना
मुलींचे जन्माचे स्वागत करणारी आणि तिला वय वर्ष १८ पर्यंत अर्थसाह्य करणारी योजना आहे. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील मुलींना टप्प्याटप्प्याने एकूण एक लाख एक हजार रुपये प्रदान करण्यात येतात.
जननी सुरक्षा योजना
गर्भवती मातांचे आरोग्य आणि संस्थात्मक प्रसूतीसाठी जननी सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबविण्यात येत आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी योजना
बस प्रवासामध्ये सवलत, महिला वसती गृह, महिला केंद्रीत पर्यटन धोरण, शाळेचे प्रवेश प्रमाणपत्र, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना विविध लाभ देण्यात येत आहेत.
व्यावसायिक शिक्षणात मुलींचा सहभाग
अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माण शास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशित मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कात शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येईल.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना मार्फत 5 लाख पर्यंत 100% अनुदान, फक्त या फळबागांची लागवड असली पाहिजे
ग्रामीण जीवनोन्नती अभियान
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सहा लाख 48 हजार महिला बचत गट कार्यरत आहेत. या संख्या सात लाख करण्यात येणार असून बचत गटांच्या मिरच्या निधीच्या रकमेत 15 हजारावरून तीस हजार रुपये वाढ करण्यात आली आहे.
युनिटी मॉल
नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येत आहे. यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल.
लखपती दीदी
ई-कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. आत्तापर्यंत पंधरा लाख महिला लखपती दीदी होण्याचा मान मिळाला आहे आणि या वर्षात 25 लाख महिलांना लखपती बनविण्याचे उद्दिष्ट आहे.
निष्कर्ष
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य आणि सामाजिक सुरक्षा यासाठी सरकारकडून घेतलेले हे महत्त्वाचे पाऊल महिलांच्या उज्ज्वल भविष्याची हमी देईल.
महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी महत्त्वाच्या योजना आणि लाभ, new schemes
new schemes: राज्यात सरकारने महिला, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये आर्थिक मदत, कर्जमाफी, बेरोजगार भत्ता आणि … Read more
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more