भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना तुम्हाला 100% अनुदान भेटणार मग तुम्ही बहुभूधारक किंवा अल्पभूधारक असाल तरी चालेल, तुम्हाला शासनाच्या शंभर टक्के अनुदानावरती फळबाग लागवड करता येते. अंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर. महाडीबीटी या संकेतस्थळावर जाऊन शेतकऱ्यांनी स्वतःची नोंदणी करून घ्यावी.
Table of Contents
अनुदान वितरण
या योजनेमध्ये देण्यात येणारे अनुदान हे तीन वर्षांमध्ये देण्यात येते. त्यामध्ये:
- पहिल्या वर्षी 50 टक्के
- दुसऱ्या वर्षी 30 टक्के
- तिसऱ्या वर्षी 20 टक्के
अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येते.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना योजना उद्दिष्टे
राज्य शासनाने राज्यामध्ये प्रभागांचे क्षेत्र वाढवण्यासाठी ही योजना राबवली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि रोजगार निर्मिती करणे आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना पात्रता
- वैयक्तिक शेतकऱ्यांना लाभ घेता येईल.
- संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.
- शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे सातबारा असणे आवश्यक आहे.
- जर सातबारा उताऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी विहित प्रपदरातील संमती पत्र आवश्यक राहील.
- जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास सातबारा उताऱ्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबवण्यासाठी फळाचे संमती पत्र आवश्यक राहणार आहेत.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेत समाविष्ट पिके
- आंबा
- डाळिंब
- काजू
- पेरू
- सीताफळ
- आवळा
- चिंच
- जांभूळ
- कोकम
- फणस
- कागदी लिंबू
- नारळ
- चिकू
- संत्रा
- मोसंबी
- अंजीर
नाविन्यपूर्ण बाबी
- फक्त कलमांद्वारे लागवड (अपवाद नारळ रोपे)
- घन लागवडीचा समावेश
- ठिबक सिंचन अनिवार्य
- शेतकऱ्यांचा सहभाग
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनामध्ये समाविष्ट बाबी
शेतकऱ्यांनी स्वखर्चाने करावयाची कामे:
- जमीन तयार करणे
- खत मिश्रणाने खड्डे भरणे
- कुंपण करणे
- खते देणे
- आंतर मशागत करणे
शासन अर्थसहाय्यित बाबी/कामे:
- खड्डे खोदणे
- कलमे/रोपे लागवड
- नांग्या भरणे
- ठिबक सिंचन करणे
- पीक संरक्षण
अटी व शर्ती
- या योजनेचा लाभ केवळ वैयक्तिक शेतकऱ्यांना घेता येईल.
- संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ अनुज्ञेय नाही.
- शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावे किमान 20 गुंठे शेत असणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याच्या स्वत:च्या नावे 7/12 असावा.
- लाभार्थी उताऱ्यावर संयुक्तपणे खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र आवश्यक आहे.
- जमीन कुळ कायद्याखाली येत असल्यास, 7/12 वर कुळाचे नाव असल्यास संमतीपत्र आवश्यक आहे.
- महाराष्ट्रात कमाल सहा हेक्टर पर्यंत लाभ अनुज्ञेय आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अर्ज प्रक्रिया
तुम्हाला जर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून अर्ज करायचा असेल तर तुम्ही महाडीबीटी वरती अर्ज करू शकता. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जे शेतकरी पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. जर शेतकऱ्याचा खर्ज जरी 5 लाख रुपय च्या वर होत असेल तरीही 100% अनुदान भेटणार.
निष्कर्ष
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि रोजगार निर्मिती करणे आहे. 100% अनुदानावरती ही योजना राबवण्यात येते, त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
उदय साबळे
युनिटी इन मराठी महाराष्ट्र