नवीन कार खरेदी – मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना सेवन सीटर एसयूव्ही कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. खरंतर अलीकडे भारतीय कार बाजारात 7 सीटर SUV कारला मोठी मागणी आली आहे.
अनेकजण सेव्हन सीटर कार खरेदी करण्याला पसंती दाखवत आहेत. दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या काळात सेव्हन सीटर एसयूव्ही गाडी खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी टॉप 3 एसयूव्ही कारची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
Table of Contents
महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक
Mahindra ही देशातील एक नामांकित ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक एसयूव्ही गाड्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. Scorpio Classic ही देखील भारतीय ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. ग्रामीण भाग असो की शहरी भाग ही गाडी तुम्हाला सहजतेने नजरेस पडणार आहे.
यावरून या गाडीची लोकप्रियता किती अधिक आहे हे आपल्या लक्षात येते. Scorpio Classic च्या किंमतीबाबत बोलायचं झालं तर ही गाडी भारतीय कार बाजारात 13.59 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होते. म्हणजे या गाडीच्या बेस मॉडेलची किंमत ही 13.59 लाख रुपये आहे.
या गाडीत 2.2-लिटर डिझेल इंजिन आहे जे जास्तीत जास्त 130bhp पॉवर आणि 300Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. कारचे इंजिन केवळ 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे.
महिंद्रा स्कॉर्पिओ एन
महिंद्रा कंपनीची आणखी एक लोकप्रिय गाडी म्हणजेच स्कॉर्पिओ एन. ही स्कॉर्पिओ नेमप्लेटची तिसरी जनरेशनची एसयूव्ही आहे. या एसयूव्हीची देखील भारतातील ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. ही गाडी अनेक नवीन फीचर्स सह आणि अपग्रेडेड पॉवरट्रेनसह बाजारात उपलब्ध होते.
ही SUV 6 आणि 7 सीटर ऑप्शनमध्ये भारतीय कार बाजारात उपलब्ध आहे. 7-सीटर Scorpio N च्या किमती बाबत बोलायचं झालं तर ही गाडी 13.85 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे. या SUV मध्ये पॉवरट्रेन म्हणून, तुम्हाला 2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळेल जे की जास्तीत जास्त 203bhp पॉवर आणि 380 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
टाटा सफारी
टाटा ही देखील भारतीय कार बाजारातील एक लोकप्रिय कंपनी आहे. या कंपनीची सफारी ही सर्वात लोकप्रिय एसयूव्हीपैकी एक आहे. टाटा सफारी मोठ्या परिवारांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. ही कंपनीची एक टॉप सेलिंग कार म्हणून ओळखली जाते. या गाडीची किंमत ही 16.19 लाख रुपयांपासून सुरू होत आहे.
यात 2.0-लिटर डिझेल इंजिन आहे जे की जास्तीत जास्त 170bhp पॉवर आणि 350Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. टाटा कंपनी लवकरच सफारीचे पेट्रोल व्हर्जन आणि ईव्ही व्हर्जन लॉन्च करणार अशी देखील माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे.
पीएम किसान योजनेचा 19वा हफ्ता या दिवशी जमा होणार 19th week of PM Kisan
19th week of PM Kisan: केंद्र सरकारद्वारे राबविण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा … Read more
सोयाबीनच्या दरात अचानक वाढ, या जिल्ह्यात एवढा दर मिळाला soyabean rate
soyabean rate: सोयाबीनच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला असून, खाद्यतेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे … Read more
पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता या तारखेला जमा होणार pm kisan yojana hapta
pm kisan yojana hapta पीएम किसान योजना ही केंद्र सरकारद्वारे राबविली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातून तीन … Read more
Onion prices in Maharashtra: कांद्याच्या भावात मोठी वाढ, शेतकऱ्यांमध्ये आनंदाची बातमी
Onion prices in Maharashtra: महाराष्ट्रातील विविध कृषी बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात सकारात्मक वाढ दिसून येत आहे, ही शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची … Read more
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वीज बिल माफीची मोठी दिलासा; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय|Electricity bill waived
Electricity bill waived: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक बहुप्रतिक्षित आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना वीज बिलात मोठी सवलत … Read more