संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबा निवृत्ती योजना चे पैसे आले नसतील तर, ह्या गोष्टी बदल्यामुळे तुमचे पैसे येत नाहीत…

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबा निवृत्ती योजनाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना, जसे की अपंग आणि मानसिक व शारीरिक दृष्टिकोनाने बिमार असलेल्या विविध व्यक्तींना, प्रति महिना १००० ते १५०० रुपये दिले जातात. एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांचे पैसे अजून लाभार्थ्यांना मिळाले नव्हते, परंतु हे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये राज्य शासनाकडून टाकण्यात सुरू झालेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये योजनेचे पैसेही वाटप चालू आहेत, परंतु अजून बऱ्याच ठिकाणी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत अशी तक्रार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

जुनी पद्धत आणि डीबीटी प्रणाली

या वेळेस येणारी योजनेचे पैसे हे डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) द्वारे येणार नाहीत. यावेळेसचे पैसे हे अगोदरच्या पद्धतीने पाठविले जाणार आहेत. हे पैसे सर्वात पहिले तुमच्या जिल्ह्यात येतील, त्यानंतर तुमच्या तालुक्याच्या तहसीलमध्ये सर्व पैसे जमा होतील आणि मग हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकली जातील. जर पैसे डीबीटी मार्फत जमा केले असते, तर सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी पैसे मिळाले असते, परंतु यावेळी जुनी पद्धत वापरल्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो.

संजय गांधी निराधार योजना documents

बँक खात्यांची स्थिती

ज्या लाभार्थ्यांचे पैसे जमा झाले नाहीत त्यांचे मुख्य कारण असू शकते की जर तुमचे बँक खाते नॅशनल बँकेचे असेल, तर पैसे लवकर जमा होतात. परंतु जी बँक नॅशनल नसेल, अशा बँकांमध्ये पैसे येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. काही महिन्यांचे पैसे अजूनही मिळालेले नसतील, तर तुमच्या जवळच्या एरियामध्ये येणाऱ्या तहसील ऑफिसकडे जावे लागेल.

तहसील ऑफिसमध्ये जाण्याची प्रक्रिया

तहसील ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथले अधिकारी आपली समस्या ऐकतील आणि तपशीलवार माहिती तपासतील. काही त्रुटी असतील किंवा बँकेची कोणती समस्या असेल तर त्याची माहिती आपल्याला अधिकारी देतील. जी काही त्रुटी असेल, ती दुरुस्त करण्यासाठी अधिकारी हयात पत्र तयार करण्याचा सल्ला देतील. हयात पत्र तयार करण्यासाठी आपल्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. हयात पत्र तहसील कार्यालयामध्ये मिळेल.

swadhar yojana : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

ही आभासु आणि निराधार मुलांसाठी महत्वाची योजना आहे

हयात पत्र आणि कागदपत्रे

हयात पत्र घेतल्यानंतर सर्व माहिती व्यवस्थितपणे भरून घ्यावी. त्याचबरोबर सांगितलेली सर्व कागदपत्रे आपल्या तहसील कार्यालयात जमा करावीत. त्यानंतर आपली सर्व कामे पूर्ण होतील आणि राहिलेले काही महिन्यांचे पैसे काही दिवसांत मिळून जातील.

हा blog आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप ग्रुपला फॉलो करा.

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

Author Box
Author Image
केशव वडवळे
माझे नाव केशव वडवळे आहे आणि मी सरकारी योजना या क्षेत्रातील एक अनुभवी लेखक आहे. गेल्या ६ वर्षांपासून मी सरकारी नोकऱ्या आणि योजनांची अद्ययावत माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. सध्या मी MHNewsX सारख्या मोठ्या व्यासपीठावर योगदान देत आहे.
join WhatsApp Group