लोकसभा निवडणूक 2024: पार पडला सहावा टप्पा, फक्त लोकसभेच्या 57 जागांचं मतदान शिल्लक

लोकसभा निवडणूक 2024-दिल्ली आणि हरियाणाच्या दोन्ही राज्यांमध्ये आज मतदान झालं, सहाव्या टप्प्यात कोणत्या मोठ्या लढतीत कोणाची प्रतिष्ठा पणाला लागली पाहूया. देशाची सत्ता कोणाच्या हाती जाईल याचा फैसला जवळपास सहाव्या टप्प्याच्या मतदानानंतर मतपेटीत बंद झालाय.

पाचव्या टप्प्यानंतर देशात फक्त 118 जागांचं मतदान बाकी होतं. त्यापैकी आज 58 जागांवर मतदान झाले आणि उर्वरित 57 जागांवर एक जूनला मतदान होणार आहे. म्हणजे देशातल्या 486 जागांवरच मतदान हे आता पूर्ण झाले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Page Follow Now

सहाव्या टप्प्यामध्ये दिल्लीच्या सर्वच्या सर्व सात जागांवर मतदान झालं. हरियाणाच्या सर्व दहा जागांवर, उत्तर प्रदेशच्या 14 जागा, बिहारमध्ये आठ, पश्चिम बंगालमध्ये आठ, झारखंड चार, ओडिशाच्या सहा आणि जम्मू काश्मीरच्या एका जागेसाठी मतदान पार पडलं.

दिल्ली आणि हरियाणा मिळून लोकसभेच्या 17 जागा आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये काय घडतंय याकडे सर्वांचे लक्ष आहे कारण 2019 च्या निकालात दिल्लीच्या सात पैकी सातही जागा आणि हरियाणाच्या दहा पैकी दहा जागा भाजपने जिंकल्या होत्या. यंदा मात्र दोन्ही राज्यांमध्ये इंडिया आघाडीने कडवे आव्हान दिल्याची स्थिती आहे.

सहाव्या टप्प्यात महत्त्वाच्या लढती पाहिल्यास:

पूर्व दिल्ली लोकसभेत भाजपचे मनोज तिवारी विरुद्ध काँग्रेसचे कन्हैया कुमार मध्ये लढत आहे. नवी दिल्लीमध्ये सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांच्याविरुद्ध आपण सोमनाथ भारती मैदानात उतरले आहेत. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेत हायकोर्टातून न्यायाधीश पदाचा राजीनामा देत भाजपचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय भट्टाचार्य उमेदवार आहेत.

हरियाणाच्या कुरुक्षेत्र लोकसभेत काँग्रेसमधून आलेल्या नवीन जिंदाल यांना भाजपने तिकीट दिलंय. त्यांच्या विरोधात आपल्या सुशील गुप्ता यांचा आव्हान असेल. हरियाणाच्या करनालच्या जागेवर भाजपचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर विरुद्ध काँग्रेसचे दिव्यांशी बुद्धी राजा मैदानात आहेत.

उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर लोकसभेत भाजपच्या मेनका गांधींच्या विरोधात सपान निषाद यांना तिकीट दिलंय.

एक जूनला होणाऱ्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात पंजाबच्या सर्वच्या सर्व 13 जागांवर मतदान होईल. उत्तर प्रदेशातील मोदींच्या वाराणसी लोकसभेसाठी सुद्धा शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

join WhatsApp Group