लखपती दीदी योजना: नवीन योजना, काय फायदे आहेत योजनेचे

लखपती दीदी योजना – पूर्ण योजना महत्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या blog मध्ये घेऊन आलो आहे. महाराष्ट्र सरकारने तसेच केंद्र सरकारने आपल्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या खास महिलांसाठी लखपती दीदी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेबद्दलची थोडीफार माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.

लखपती दीदी योजना काय आहे?

लखपती दीदी योजना ही काय आहे आणि त्या योजनेअंतर्गत महिलांना कशाप्रकारे लाभ भेटणार आहे, जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत, तसेच ही योजना सध्या सुरू आहे का नाही याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत दोन करोड महिलांना लखपती होता येणार आहे.

लखपती दीदी योजना सुरू करण्याची पार्श्वभूमी

प्रणुकताच देशांमध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत भाषण करत असताना नव्या मधे करून योजनेची घोषणा करण्यात आली. लखपती दीदी योजना काही राज्यांमध्ये चार नोव्हेंबर 2022 पासून अस्तित्वात आहे. परंतु आता केंद्र शासनाकडून दोन करोड महिलांना लखपती बनवण्यासाठी लखपती दीदी योजना सुरू करण्यात येत आहे.

लखपती दीदी योजनेचा उद्देश

बचत गटाशी सलग्न असलेल्या महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षणामध्ये महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब निर्मिती, ड्रोन चालविणे, विविध यंत्र सृष्टी अशा प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

लखपती दीदी योजना आवश्यक कागदपत्रे

योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँकेचा झेरॉक्स
  • शैक्षणिक कागदपत्रे (दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन)
  • चालू मोबाईल क्रमांक
  • पासपोर्ट साईज फोटो (पाच ते सहा)

लखपती दीदी योजना पात्रता

लखपती दीदी योजनेसाठी अर्जदार महिला असणे आवश्यक आहे. योजना फक्त महिलांसाठी आहे. अर्जदार महिलांचे वार्षिक उत्पन्न एक ते अडीच लाखांच्या दरम्यान असावे. अर्जदार महिला भारतीय नागरिक असाव्यात.

लखपती दीदी योजनेचे लाभ

महिलांना विविध क्षेत्रातील प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळणार आहे. महिलांना लघुउद्योग करण्यासाठी प्रोसेस देण्यात येईल. तसेच, विविध लघुउद्योगांसाठी लागणारे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे.

लखपती दीदी योजना अर्ज प्रक्रिया

सध्या या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाइन सुरू करण्यात आलेली नाही. परंतु लवकरच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

निष्कर्ष

या ब्लॉग मध्ये लखपती दीदी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याबाबत अपडेट्स लवकरच मिळतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि website ला सबस्क्राईब करायला विसरू नका.

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

join WhatsApp Group