युवकानी वाचवले हरनाचे प्राण: हरणाला दिले जीवनदान

Nanded news: सुधाकर वडवळे या युवकानी स्वतःचा प्राण मुठीत घेऊन हरणाचे वाचवले प्राण

सद्या उन्हाळ्याला सुरुवात होत आहे, त्यामुळे अनेक जनावरे पाण्याच्या शोधात भटकंती करत असतात. त्याच प्रमाणे ११/०२/२०२४, रविवार सायंकाळी 1 वर्षाचे हरीण पाण्याच्या शोधात नांदेड जिल्यातील कापसी (बुद्रुक) या गावातील रानातल्या विहिरीत पडले. तरी कापसी गावातील युवकाची विहिरीकडे गेल्यावर सहज नजर पडली त्यांना विहिरीमध्ये हरीण ओरडत असताना दिसले.

त्या युवक शेतकऱ्याचे त्वरित वनरविभाग अधिकाऱ्याला कळविले आणि त्या हरनीला वाचवण्याची धडपड सुरु झाली. अधिकारी येजेपर्यंत शेतकऱ्याने विहिरीवरील विजेच्या पंपाच्या साह्याने शेतीला द्यायचे संपूर्ण पाणी कालव्यात सोडून दिले. शेतकऱ्याचे नाव परमेश्वर वडवळे आहे. आणि त्यांच्या सोबत काही शेजारील शेतकरी होते. त्यांची नावे, सुधाकर वडवळे, सोपान वडवळे, सदाशिव वडवळे आहेत.

नंतर वनविभाग अधिकारी आल्याच्या नंतर त्यांच्या निदर्शनाखाली कापसी गावातील युवक सुधाकर वडवळे ह्यांनी स्वतःच्या प्राणाची काळजी न घेता दोरीच्या साह्याने विहिरीमध्ये उतरण्याचे काम केले. विहीर नवीन खोदायला चालू आहे, त्यामुळे विहिरीमध्ये जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचे धरण्यासाठी नाही. तरीही सुधाकर वडवळे यांनी विहिरीत जाण्याचा निर्णय घेतला. खाली जाऊन त्यांनी दोरीच्या साह्याने त्या हरणीला बांधले. तस जंगली प्राण्यांना कंट्रोल करणे थोडसे अवघडच, ते माणसांची सवय नसल्यामुळे घाबरून माणसावर हल्ला पण करूशकतात. पण त्या युवकांनी अश्या कोणत्याच गोष्टीचा विचारण न करता, त्या मुक्या जनावराला वाचवले. त्यांच्या या कामगिरीला आमचा सलाम. सुधाकर वडवळे तुमच्यासारखे युवक कमी आहेत जगात, ह्याच उद्देष्यावर जगात राहा.

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

join WhatsApp Group