महाराष्ट्रातील पावसाची स्थिती: चक्रीवादळासह पाऊस येण्याची शक्यता

महाराष्ट्रातील पावसाची स्थिती – स्वागत आहे मित्रांनो! आज 27 मे 2024, रविवार. राज्यातील पावसाची स्थिती आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे, याविषयी आपण या blog च्या माध्यमातून पाहणार आहोत.

सध्या राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशातील अनेक भागांत तापमान 50 अंशांवर पोहोचले आहे. आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे तर काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे महाराष्ट्राच्या तापमानात प्रचंड वाढ होत आहे. ज्या भागांमध्ये वाऱ्याचा वेग कमी झाला किंवा वारे शांत झाले, तिथे उकाडा जास्त आहे. कालच आपण रेमल चक्रीवादळाबाबत अपडेट घेतली होती. हे चक्रीवादळ गेल्यानंतर राज्यात मोठ्या पावसाची सुरवात होणार आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात वारे आणि बाष्पाचे ढग महाराष्ट्राकडे येत आहेत. यामुळे मे महिन्यात जास्त उष्णता जाणवत आहे.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे. दक्षिण कोकण आणि गोव्याला परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. धाराशिव परिसरात ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्येही पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नागपूर जिल्ह्यातही ढगाळ वातावरण राहील. संध्याकाळी आणि रात्रीपर्यंत कोकण परिसर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. धुळे, साक्री, नंदुरबार, शिरपूर या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

चक्रीवादळामुळे राज्यात बऱ्याच भागात वेगाने वारे वाहताना दिसतील. पुढील काही दिवसांत वातावरणात मोठे बदल होऊन मोठ्या पावसाची शक्यता आहे.

Hi, I am a Software Engineer and passionate about making news on the latest updates and love to share Indian news in Marathi. Delivering the latest updates on Business, Travel, Education, Exams, lifestyle, fashion, political, Sports etc.

Leave a Comment

join WhatsApp Group